Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खाली TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते ?
#2. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे ?
#3. कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर कोणत्या परिणामाने मोजतात ?
#4. ‘मुंबई हाय’ हे कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे ?
#5. कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती आहे ?
#6. भारतातील कोणते ठिकाण हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे ?
#7. क्योटो करार कशाशी संबधित आहे ?
#8. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?
#9. कोणत्या समाजसुधारकास लोकहितवादी म्हणू ओळखले जाते ?
#10. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात ?
#11. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता ?
#12. इ.स. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली होती ?
#13. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
#14. पोलिस पाटलाची नेमणुक कोण करतात ?
#15. ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती आहे ?
#16. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
#17. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोणती ?
#18. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
#19. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
#20. प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते ?
#21. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#22. महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे ?
#23. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
#24. सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
#25. सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भराती बद्दल अपडेट मिळेल.