Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. पुढील वर्षी दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
#2. कोणत्या राज्यातील सरकारने वफ्फ बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे ?
#3. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीची कलाकृती चंद्रावर संग्रहीत होणार आहे ?
#4. कोणत्या राज्यामध्ये अखिल भारतीय पोलिस महानिर्देशक आणि महानिरीक्षक यांचे 2024 ला संमेलन आयोजित करण्यात आले होते ?
#5. हॉर्नीबल महोत्सव अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला ?
#6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमबजावणी राष्ट्राला समर्पित केली, या तिन्ही कायद्यांची 100 टक्के अंमलबजावणी करणारी कोणती प्रातिनिधिक प्रशासकीय संस्था अव्वल ठरली आहे ?
#7. भारतीय वन्यजीव संस्थेकडून संपूर्ण देशात कोणत्या प्राण्यांच्या गणनेचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे ?
#8. अलीकडेच लष्कराच्या ताफ्यात कोणते नवीन स्वदेशी ड्रोन दाखल झाले आहे ?
#9. ‘ एक देश एक विद्यार्थी ओळख ‘ या संकल्पनेतून येणारे ‘ अपार ‘ नोंदणीत कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे ?
#10. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
#11. भारताचा पहिला वर्टिकल लिफ्ट सी ब्रीज कोणत्या राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे ?
#12. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार जागतिक ध्यान दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येणार आहे ?
#13. महापेक्स 2025 हे महाराष्ट्राचे राज्यस्तरीय टपाल तिकिटाचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 ला कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे ?
#14. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो ?
#15. 2024 अंडर 19 आशिया कप कोणत्या देशाने जिंकला आहे ?
#16. कोणत्या सर्वात लहान भारतीय बुद्धिबळ पटूने ग्रँडमास्टरला हरवून ऐतिहासिक विक्रम केला आहे ?
#17. भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते कितवे गव्हर्नर ठरले आहे ?
#18. वर्ष 2026 मध्ये कोणत्या देशांमध्ये टी- 20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे ?
#19. आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने {फिफा} 2034 साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला देण्याचे जाहीर केले ?
#20. कोणत्या देशाला संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ नियंत्रण आयोगाचे 68 व्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे ?
#21. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या तसेच मुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्ष प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?
#22. देशातील सुप्रसिद्ध लेखिका असलेल्या 34 व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
#23. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
#24. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले आहे ?
#25. टाईम मॅगजीनने 2024 चा ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून कोणाची निवड केली आहे ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.