Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. स्टाफ सलेक्शन कमिशनचे (SSC) सध्या अध्यक्ष कोण आहेत ?
#2. यावर्षी ‘अमुर बाज उत्सव’ कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?
#3. खेलों इंडिया युथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?
#4. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे विधी सेवा समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
#5. कोणत्या भारतीय अभिनेत्याला थायलंड देशाचा ब्रँड अँबेसिडर बनवण्यात आले आहे ?
#6. पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे ?
#7. भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्टच्या निर्मितीसाठी भारत आणी कोणत्या देशांदरम्यान करार झाला आहे ?
#8. हरिनी अमरसुर्या या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहे ?
#9. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (FIH) अध्यक्ष कोण आहेत ?
#10. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहे ?
#11. 15 व्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत ?
#12. 70 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 29 ऑक्टोंबर 2024 ला कोणती योजना सुरू करण्यात आली आहे ?
#13. राष्ट्रीय युवामहोत्सव 11 ते 12 जानेवारी 2025 ला कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे ?
#14. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 कोणत्या अभिनेत्याला प्रदान करण्यात आला ?
#15. गोवा येथे संपन्न झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2024 ची थीम काय आहे ?
#16. 2024 या वर्षीची महिला टेनिस संघ (WTA) ची विजेती कोण आहे ?
#17. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान झाले ?
#18. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
#19. भालाफेक पटू नीरज चोप्रा यांचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
#20. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ चे 11 ते 12 जानेवारी 2025 रोजी कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे ?
#21. ऑक्टोंबर 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया 2+2 सचिव स्तरीय वार्ता बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली आहे ?
#22. डॉ. नवीन रामगुलाम हे कोणत्या देशाचे प्रधानमंत्री आहेत ?
#23. आयपीएल 2025 साठी 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी या खेळाडूला एक कोटी दहा लाख रुपयांत कोणत्या संघाने खरेदी केले आहे ?
#24. महाराष्ट्र राज्यात एकूण वाघांची संख्या किती आहे ?
#25. राज्य सहकारी बँकांच्या प्रवर्गात कोणत्या राज्याची सहकारी बँक अव्वल ठरली आहे ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.