maharshtra police practice paper :
maharshtra police practice paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खाली TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद.
Results
#1. 18 वे प्रवासी भारतीय दिवस 2025 चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे ?
#2. 38 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यांमध्ये करण्यात येणार आहे ?
#3. काजिंद युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात दरम्यान होत असतो ?
#4. कोणत्या देशाने T-20 मध्ये सर्वाधिक धावसंख्या पटकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे?
#5. 16 वी BRICS शिखर परिषद 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ?
#6. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे ?
#7. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2024 हे वर्ष कशासाठी घोषित केलेले आहे ?
#8. मिस इंडिया 2024 ची विजेती कोण ठरलेली आहे ?
#9. जागतिक पर्यटन दिन 2024 ची थीम काय होती ?
#10. 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला जाहीर करण्यात आला आहे ?
#11. खालीलपैकी कोणत्या देशाकडे G-20 2025 चे अध्यक्ष पद राहणार आहे ?
#12. राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
#13. BRICS संघटनेत एकूण किती देशांचा सहभाग आहे ?
#14. नवनियुक्त संजीव खन्ना हे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश आहे ?
#15. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे ?
#16. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडणाऱ्या विधानसभेच्या कितव्या निवडणुका आहेत ?
#17. 2025 ला होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
#18. भारतात एकूण अभिजात भाषा प्राप्त भाषांची संख्या एकूण किती झाली आहे ?
#19. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोणत्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे ?
#20. साहित्य नोबेल पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
#21. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?
#22. आयसीसी टी-ट्वेंटी पुरुष विश्व कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे ?
#23. रणजी ट्रॉफी 2024 चा विजेता संघ कोणता ठरला आहे?
#24. पहिले मधाचे गाव मांघर हे कोणत्या तालुक्यात आहे ?
#25. एशिया पावर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
maharshtra police practice paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
maharshtra police practice paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
maharshtra police practice paper :
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, लसावी मसावी, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरातीबद्दल अपडेट मिळेल.