Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या पोलिस भरतीसाठी आणि होणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. ‘आईने मुलास समजावले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#2. पवन या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा.
#3. सिया शाळेत जाते. – प्रयोग ओळखा.
#4. मुष्टीमोदक या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
#5. नंपुसक या शब्दाचा समास खालील पर्यायातून ओळखा.
#6. ज्याप्रमाणे – तारकांचा : पुंज, मडक्यांची : उतरंड तसेच जहाजांचा : ?
#7. खालीलपैकी कोणत्या लेखकाला ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते ?
#8. ‘रंजीस येणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
#9. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?
#10. भारतीय राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश खालीलपैकी कशात केलेला आहे ?
#11. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले ?
#12. महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली ?
#13. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
#14. भारत ऊर्जा सप्ताह 2025 चे आयोजन 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे ?
#15. भारताने ड्रोनच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी कोणत्या आपल्या पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे ?
#16. आकाश उत्तरेकडे तोंड करून आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळतो आणि नंतर घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने 90 अंश वळतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
#17. 533, 534, 542, 569, 633, ?
#18. 43, 44, 52, 79, 143, ?
#19. 9 पुस्तकांची सरासरी किमंत रू. 25 आहे. त्यामध्ये दहाव्या पुस्तकाची किंमत मिळविल्यास सरासरी किंमत रु. 23 होते ; तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती ?
#20. एका आयातची लांबी 8 सेमी व रुंदी 6 सेमी असल्यास आयताची परिमिती काढा.
#21. एका संख्येच्या 50 टक्क्यांमधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते. तर ती संख्या कोणती ?
#22. ताशी 90 किमी वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किमी अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किमी वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती ?
#23. AOC, BPD, ?, DRF प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा.
#24. दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली. तर अनुत्तीर्ण होणाऱ्या मुलांची संख्या किती ?
#25. दर दोन मीटर अंतरास एक याप्रमाणे 50 मीटर अंतरास किती काठ्या रोवता येतील ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.