Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या पोलिस भरतीसाठी आणि होणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. खालील पर्यायातून इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा.
#2. तिने चिंच खाल्ली. – प्रयोग ओळखा.
#3. आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
#4. मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत ?
#5. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ?
#6. ‘ यक्षप्रश्न’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा.
#7. गडद, दाट, पक्का या शब्दांचा समानार्थी शब्द सांगा.
#8. ‘चरणकमल’ या शब्दाचा समास ओळखा.
#9. जर 28 मी. व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मी. रुंद रस्ता असेल. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती ?
#10. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील ?
#11. 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बरेजेपेक्षा कितीने कमी आहे ?
#12. एका शाळेत विदयार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?
#13. तीन क्रमागत विषम संख्यांची बेरीज 147 आहे तर मधील संख्या कोणती ?
#14. एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर त्याने सर्व 60 प्रश्न सोडवले आणि 130 गुण त्याला मिळाले तर त्याने किती प्रश्न अचूक सोडविले ?
#15. राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय ?
#16. उषा कमलापेक्षा वेगाने धावते, प्रीती स्वातीपेक्षा हळू धावते, स्वाती कमालापेक्षा हळू धावते. सर्वात हळू कोण धावते ?
#17. एक व्यक्ती उत्तरेकडे 12 किमी, मग पूर्वेकडे 15 किमी, नंतर पश्चिमेकडे 19 किमी आणि त्यानंतर दक्षिणेकडे 15 किमी चालते. ती आरंभ बिंदुपासून किती दूर आहे ?
#18. एका खेळाडूचा खालून क्रमांक 18 वा आणि वरून 27 वा आहे. तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत ?
#19. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर उर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात ?
#20. सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते ?
#21. नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे ?
#22. खालीलपैकी कोणत्या किल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत ?
#23. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत ?
#24. देशातील पहिली ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?
#25. अलीकडेच चर्चेत असलेले शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.