Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा.
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती आहे ?
#2. नयन या शब्दाचा संधिविग्रह करा.
#3. ‘कुत्र्याने चावा घेतला.’ या वाक्यातील नाम ओळखा.
#4. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?
#5. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे ; परंतु एकवचनास प्रत्यय नाही ?
#6. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?
#7. ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला ?’ सर्वनामाचा प्रकार ओळखा.
#8. श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण कोणते ?
#9. ‘ताईने निबंध लिहिला आहे.’ वाक्यातील काळ ओळखा.
#10. ‘ला’ ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो ?
#11. श्रीशांत क्रिकेट खेळतो. या वाक्यातील क्रियपदाचा प्रकार ओळखा.
#12. ‘मी गावाला जात आहे.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
#13. ‘सुनील येथे क्वचित येतात.’ क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
#14. खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ?
#15. सकेंतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखली जातात ?
#16. ‘परीक्षा जवळ आल्यावर तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
#17. रक्तचंदन व कमलनयन – समास ओळखा.
#18. ‘पाणसाप’ या सामासिक शब्दातील समास ओळखा.
#19. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार होतो ?
#20. पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे ?
#21. खालीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
#22. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्यातील उद्देश ओळखा.
#23. ‘अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’ – या वाक्यातील विधेयविस्तार ओळखा.
#24. खालीलपैकी उपसर्गघटित शब्द ओळखा.
#25. ‘इतरांच्या आधारावर जगणारा’ या शब्दासमुहासाठी शब्द ओळखा.
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.