महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -2 : Maharashtra Police Practice paper

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -2 Maharashtra Police Bharati Practice paper
महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -2 Maharashtra Police Bharati Practice paper

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharshtra Police Practice Paper :

   maharshtra police practice paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा . 

खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.

धन्यवाद 🙏🙏

 
TEST START

Results

#1. ‘ती गुलाबी उषा म्हणजे रमेश्वराचे प्रेम जणू’ या वाक्याचा अलंकार ओळखा.

#2. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात ?

#3. ‘बदल घडणे’ या क्रियेला काय म्हणतात ?

#4. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?

#5. खालील पर्यायातून भाववाचक नाम ओळखा.

#6. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

#7. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

#8. मुलगा या शब्दाचे अनेकवचन खालील पर्यायातून निवडा.

#9. सप्तमी या विभक्ती चा अर्थ काय आहे ?

#10. साखरभात या शब्दाचे लिंग खालील पर्यायातून ओळखा.

#11. लाडू या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.

#12. मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत ?

#13. ला-ख्याता वरून कोणता काळ ओळखला जातो ?

#14. ‘सदासर्वदा योग तुझा घडावा’ या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा.

#15. सबब हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

#16. ‘येणार असेल तर येईन बापडा!’ या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

#17. मांजर उंदीर पकडते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

#18. ‘गर्जेल तो पडेल काय!’ हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?

#19. वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.

#20. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

#21. अनंत या शब्दाचा खालीलपैकी समास ओळखा.

#22. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

#23. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

#24. ‘रामाने पुस्तकावर नाव घातले’ या वाक्यातील आधारपूरक शब्द कोणता.

#25. विधेय म्हणजे काय ?

#26. देशाच्या निवडणुक आयुक्ताला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे ?

#27. कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विक्रेंद्रिकरण समिती सुद्धा म्हटले जाते ?

#28. भारतातील स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती ?

#29. वर्ष 1918 च्या मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

#30. जगन्नाथ शंकशेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते ?

#31. कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली ?

#32. ब्रिटिश सरकारने पहिला फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केले होते ?

#33. दीनमित्र या पत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली ?

#34. नाशिक येथील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख कोण होते ?

#35. महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या उठावाला काय म्हटले जात होते ?

#36. राज्य सहकारी बँकांच्या प्रवर्गात कोणत्या राज्याची सहकारी बँक अव्वल ठरली आहे ?

#37. पहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा जानेवारी 2025 ला कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे ?

#38. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना या देशातील कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

#39. 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान झाले ?

#40. गोवा येथे झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2024 ची थीम काय होती ?

#41. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे ?

#42. कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरण बांधली आहे ?

#43. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते ?

#44. टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

#45. सोनालिका ही खालीलपैकी कशाची जात आहे ?

#46. महाराष्ट्र पोलीस दलाचे सध्या महासंचालक कोण आहेत ?

#47. पोलिस खाते हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ?

#48. मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती चौ.किमी. आहे ?

#49. कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ?

#50. कोणत्या वर्षी बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे ठेवले ?

#51. खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवून सिया म्हणाली, त्याच्या आईची एकुलती एक मुलगी माझी आई आई आहे, तर सिया त्या व्यक्तीची कोण आहे ?

#52. सुनीलची आई ही राधिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर राधिकाच्या पतीचे सुनीलशी नाते काय ?

#53. सर्व गोल त्रिकोण आहेत. काही त्रिकोण चौकोन आहेत. म्हणून सर्व गोल चौकोन आहेत. खालील पर्यायातून योग्य पर्याय शोधा.

#54. एका सैन्य तुकडीतील 288 जवानांना रांगेत उभे राहण्यास सांगितले प्रत्येक रांगेत जेवढे जवान आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती जवान आहेत ?

#55. राजू पूर्वेकडे 10 किमी चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किमी गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किमी गेला, त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किमी गेला तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत अंतर किती आहे ?

#56. तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, त्यांची आजचे वय काढा.

#57. घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकटा किती अंशातून फिरेल ?

#58. जर आज सोमवार,1 ऑगस्ट आहे आणि श्रावणाचा पहिला दिवस आहे, तर उद्यापासून 29 व्या दिवशी कोणता दिवस येणार ?

#59. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद ओळखा. 15, 21, 24, 30, 32, 39, 51

#60. पुढील संख्यामालिकेत x च्या जागी कोणती संख्या असेल ? 3, 7, 15, 31, x, 127, 255, 511

#61. दिलेल्या श्रेणीतील पुढील संख्या कोणती येईल ? 26, 50, 82,…?

#62. जर AT= 20, BAT= 40 तर CAT= ?

#63. PEN = 35, BALLPEN = 62 तर पेपर = ?

#64. जर ARMY हा शब्द 3201527 तर POLICE हा शब्द कसा लिहाल ?

#65. जर J, K, L, M ,N, O, P, Q हे आठ खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर बसलेले आहेत. जर M हा पूर्व दिशेला बसला असेल तर J हा कोणत्या स्थानावर बसलेला असेल ?

#66. एका रांगेत मधल्या मुलाचा 17 वा क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती असतील ?

#67. रिया व सिया यांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे. रिया ही सिया पेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे तर रिया चे वय किती ?

#68. मालिका पूर्ण करा. 0, 2, 24, 252,…?

#69. मालिका पूर्ण करा. 5, 25, 61, 113,..?

#70. HJLN : ILOR :: DFHJ : .?..

#71. पहिल्या दोन शब्दांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. 86 : 29 :: 98 : ?

#72. 122 : 170 :: 290 : ? प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

#73. APOC: ? :: ITSK : MVUN प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

#74. एका गोदामातील धान्य 800 कुटुंबांना 20 दिवस पुरते, तेच धान्य 200 कुटुंबांना किती दिवस पुरेल ?

#75. 3 कागद टाईप करण्यासाठी 40 मिनिटे लागतात , तर 12 कागद टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल ?

#76. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीस 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल ?

#77. एक सख्या 45 टक्क्यांनी वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?

#78. 7663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?

#79. 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 4/3 येईल ?

#80. चाऱ्याची एक गासडी नऊ वासरे किंवा सात गाईंना पुरते. तर याच मानाने नऊ गासड्या चारा 54 वासरे व किती गायींना पुरेल ?

#81. एक फलंदाज 19 व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल ?

#82. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळविले तर सरासरी 11 येते. तर शिक्षकाचे वय किती ?

#83. 15, 7, 16, 8 आणि X यांची सरासरी 13 येत असेल तर X = काय असेल ?

#84. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रू. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती असेल ?

#85. आर्वी ने एक जुना फ्रीज 60000 रू. ला घेतला. एका वर्षानंतर तो फ्रीज 45000 रू. ला विकला. तर शेकडा तोटा किती ?

#86. एका 16000 रुपये किमतींच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते, तर दोन वर्षानंतर त्याची किंमत किती ?

#87. 1600 चे 60 टक्के हे x च्या 80 टक्क्यांइतके आहेत. तर x ची किंमत किती ?

#88. 2100 चे 16 टक्के किती ?

#89. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती ?

#90. 50 पैसे व 1 रू.यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयांत 50 पैशांची किती नाणी येतील ?

#91. काजूची किंमत प्रतिकीलो 1000 रू. तर पिस्त्याची किंमत प्रतिकिलो रू. 1200 आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रतीकीलो 1050 रू. विकले, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती ?

#92. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील ?

#93. ताशी 45 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस , 400 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल ?

#94. 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत ?

#95. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या ?

#96. समान व्यासाचे 3 नळांनी एका पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते, जर तेवढ्याच व्यासाचे 5 नळ एकच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल ?

#97. जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात तेच काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लावावीत ?

#98. 6 मजूर एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात तर तेच काम 2 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

#99. 300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किमी वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल?

#100. 9 पुस्तकांची किंमत 140 रू. आहे. त्यामध्ये दहावी पुस्तकाची किंमत मिळविल्यास सरासरी किंमत 150 रु. होते, तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती ?

Previous
Submit

 

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :

   maharshtra police practice paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.

    maharshtra police practice paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 

  •  गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
  • बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
  • मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह. 
  • सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.

           महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरातीबद्दल अपडेट मिळेल.

 

Leave a Comment