SSC GD Constable Admit Card 2025 : एसएससी जीडी कॉन्स्टेबल हॉल तिकीट 2025

SSC GD Constable Admit Card 2025 :
SSC GD Constable Admit Card 2025 :

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC GD Constable Admit Card 2025 : 

     SSC GD Constable Admit Card 2025 : कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) घेण्यात येणाऱ्या एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2025 च्या हॉल तिकीट बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. लवकरच एसएससी मार्फत हॉल तिकीट ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध होतील. सदर विद्यार्थ्यांची परीक्षा ही 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. ही एक तरुण – तरुणींसाठी एक देशसेवेसाठी सुवर्ण संधी आहे. सदर विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा सखोल अभ्यासक्रम पाहून त्यानुसार अभ्यास करावा. विद्यार्थ्यांकडे आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहे.

    SSC GD Constable Admit Card 2025 : A new update has come out regarding the Hall ticket of SSC GD constable 2025 conducted by staff selection commission (SSC). Soon the hall ticket will be available on the official website of www.ssc.nic.in. SSC GD examination of the students will start from 04 February 2025. This is the golden opportunity for young men and women to serve the country. The students should study accordingly by looking at the details syllabus of this examination and the students have only a few days left for this examination.

   SSC GD Constable Admit Card 2025 : कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) जीडी कॉन्स्टेबल मध्ये BSF, CISF, ITBP, NCB, SSB, ASAM RIFLES इत्यादी दलामध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीसाठी एकूण 39481 पदांसाठी 05 सप्टेंबर 2024 ते 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले होते. सदर परीक्षेसंबधित एक एसएससी मार्फत अपडेट जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा ही 4 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. सदर  विद्यार्थ्यांना हॉल तिकिट www.ssc.gov.in या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

   The Staff Selection Commission (SSC) as publish advertisement for the recruitment of GD Constable in BSF, CISF, ITBP, SSB, Assam rifle etc. for this recruitment, application were filled online from 05 September 2024 to 15 October 2024 for a total 39481 posts. And update regarding the shade examination as been announced by SSC according to which the examination of students will be held from 4 to 25 February 2025. The hall ticket of the students can be downloaded from the website www.ssc.gov.in

Indian Navy INCET Admit Card 2024 : 

 सर्वात प्रथम विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. सदर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (CBT) घेण्यात येणार असून, ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण 80 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल. या परीक्षेमध्ये एकूण चार भाग असतील म्हणजेच चार विषय असतील, जसे की बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि इंग्रजी किंवा हिंदी असे एकूण प्रत्येकी 20 प्रश्न म्हणजेच हे चार विषय मिळून 80 प्रश्न असतील. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी 60 मिनिटांचा वेळ देण्यात येईल.

   First of all a written Examination will be Conducted for the students. The examination will be conducted online CBT and Will be Multiple Choice Questions. There will be a total of 80 Questions in Online Examination and each questions will be for a 02 marks. There will be a total of four parts in this examination i.e. four subjects search as Intelligent Knowledge, General Awareness, Arithmetic and English or Hindi with a total of 20 questions each subject and total will be 80 questions together. This examination time allotted for the 60 minutes.

    ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. ज्यामध्ये पुरुषांसाठी 5 किमी धावणे 24 मिनिटात आणि महिला उमेदवारांसाठी 1.6 किमी धावणे 8.30 मिनिटात. अश्याप्रकारे चाचणी घेण्यात येईल.

हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे :

  • हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम उमेदवारांनी एसएससीच्या वेबसाईट वर जाऊन तिथे तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एसएससी जीडी कॉन्स्टेबल ऍडमिट कार्ड 2025 अशी लिंक दिसेल, त्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला लॉगिन विंडो तुमच्या समोर दिसेल त्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. 
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता.
  • परीक्षेला जाताना तुम्हाला तुमचे कलर प्रिंट केलेलं हॉल तिकीट आणि वैद्य ओळखीचा पुरावा सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. 

ऑनलाईन परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती :

  • सदर ही परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर ही परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये होणार आहे.
  • या  परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धती असेल, चुकीच्या प्रश्नासाठी 0.50 एवढे गुण कमी करण्यात येतील. परीक्षेबाबत सर्व माहिती ही एसएससीच्या वेबसाईट वरच कळविण्यात येईल.

परीक्षेची अधिक माहिती आणि हॉल तिकिट डाउनलोड :

अधिक माहिती येथे पहा
हॉल तिकीट डाउनलोड करा येथे डाउनलोड करा

 

Leave a Comment