RRB Group-D Bharti 2025 – रेल्वे मध्ये 10 वी पास धारकांसाठी 32428 जागांसाठी भरती सुरू
RRB Group-D Bharti 2025 : भारतीय रेल्वे मध्ये इयत्ता दहावी पास धारकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डामार्फत (RRB) इयत्ता दहावी पास किंवा ITI उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ग्रुप -D लेव्हल -1 या पदासाठी रेल्वेमध्ये तब्बल 32,428 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरून सादर करावा. रेल्वेची ही ग्रुप – डी ची नोकरी आहे, ज्यामध्ये विविध पदे आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी दिलेली माहिती व अटी व्यवस्थित वाचूनच अर्ज भरावा. उमेदवारांनी खोटी माहिती अर्जामध्ये टाकल्यास त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते, त्यामुळे अर्ज भरताना आपले आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवूनच अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी rrbapply.gov.in या वेबसाईट वर जाऊन तुम्ही पाहू शकता.
RRB Group-D Bharti 2025 : RRB मार्फत रेल्वेच्या 16 झोनमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी या पदासंबंधी शिक्षण, परीक्षा अभ्यासक्रम, कागदपत्र आणि मैदानी चाचणी याबद्दल माहिती पाहून घ्यावी. उमेदवारांना निवड होण्यासाठी तीन टप्प्यांतून जावे लागेल, जसे की कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि कागदपत्र पडताळणी. या ग्रुप D पदांसाठी लेव्हल -1 ची सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन 18000 रू आणि अधिक देय भत्ते जसे की महागाई भत्ता (DA), वाहतूक भत्ता, घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय सुविधा असेच वेगवेगळे भत्ते उमेदवारांना असणार आहे. परिक्षांसंबंधी वेळापत्रक व हॉल तिकीट बद्दल माहिती वेळोवेळी ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर
RRB Group-D Bharti 2025 शैक्षणीक व शारीरिक पात्रता :
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा किंवा मान्यताप्राप्त बोर्डाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक
- शारीरिक पात्रता (पुरुष) : लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 35 किलो वजन घेऊन 100 अंतर 2 मिनिटात वाहून नेणे आहे. आणि 1000 मीटर धावणे 4 मिनिटे 15 सेकंदाच्या आत.
- शारीरिक पात्रता (महिला) : लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांना 20 किलो वजन घेऊन 2 मिनिटात 100 मीटर जाणे आणि 1000 मीटर धावणे 05 मिनिटे 40 सेकंदाच्या आत.
- या सर्व शारीरिक चाचणीसाठी एक संधी देण्यात येईल.
RRB Group-D Bharti 2025 पदाचे नाव व रिक्त पदे :
| पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
| पॉइंट्समन – B | 5058 |
| असिस्टंट (Track Machine) | 799 |
| असिस्टंट (Bridge) | 301 |
| ट्रॅक मैंटेनेर (Gr.IV) | 13187 |
| असिस्टंट P-Way | 257 |
| असिस्टंट (C&W) | 2587 |
| असिस्टंट TRD | 1381 |
| असिस्टंट (S&T) | 2012 |
| असिस्टंट लोको शेड (Diesel) | 420 |
| असिस्टंट लोको शेड (Electrical) | 950 |
| असिस्टंट ऑपरेशन्स (Electrical) | 744 |
| असिस्टंट TL & AC | 1041 |
| असिस्टंट TL & AC (Workshop) | 624 |
| असिस्टंट (Workshop) (Mech) | 307 |
वयोमर्यादा व परीक्षा फी :
- कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 36 वर्षापर्यंत (UR & EWS- 02.01.1989, OBC – 02.01.1986 आणि 02.01.1984)
- UR/OBC/EWS – 500/- रुपये (परीक्षा दिल्यानंतर 400 रुपये परीक्षा फी परत मिळणार आहे)
- SC/ST/PH/EBC – 250/- रुपये
- सर्व महिलांसाठी फी – 250/- रुपये
- परीक्षा शुल्क हे UPI, डेबिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरावे लागणार आहे.
महत्त्वाचे कागदपत्रे :
- पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी
- इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- अर्ज भरताना लागणारे आवश्यक कागदपत्रे
परीक्षा पद्धती :
- सर्व प्रथम उमेदवारांची सीबीटी घेण्यात येईल जी 100 गुणांची असेल. त्यामध्ये 100 प्रश्न असतील .
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल.
- या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची टक्केवारी UR/EWS- 40 % आणि OBC/SC/ST – 30% .
- या CBT साठी 1) सामान्य विज्ञान – 25 गुण 2) गणित – 25 गुण 3) सा.बुद्धिमत्ता – 30 4) सामान्य ज्ञान – 20 गुण
- परीक्षा ही इंग्रजी, हिंदी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
- आसामी, बंगाली, मराठी, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, तमिळ, तेलगू, उर्दू, पंजाबी, ओडिया, मणिपुरी या भाषांमध्ये होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :
- अर्ज सुरु तारीख : 23/01/2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22/02/2025
- परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख : 24/02/2025
- अर्ज दुरुस्त करण्याची तारीख : 25/02/2025 ते 06/03/2025 या कालावधीत
ऑनलाईन अर्ज व जाहिरात :
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| जाहिरात | येथे डाऊनलोड करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |