
नमस्कार मित्रांनो आपल्या नोकरी पॉईंट या वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे. आज आपण लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासनाने आपल्या लाडक्या बहिणीसाठी चालू केलेली आहे त्यासाठी एक नवीन अपडेट सरकारकडून आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत पाच महिन्यांच्या हप्ते प्राप्त झालेले आहे परंतु आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळात पुढचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळू शकणार नाही. कारण नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहे.
Majhi Ladaki Bahin Yojana 2024
Majhi Ladaki Bahin Yojana 2024 : तुम्हाला डिसेंबर मध्ये भेटणार हप्ता तुम्हाला निवडणूक झाल्यानंतरच भेटण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुका झाल्यानंतर ज्या कोणी महिलांनी हा फॉर्म भरला नसेल तेव्हा परत लिंक ओपन होईल आणि तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा अर्ज भरू शकता आणि या लाडक्या बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
Majhi Ladaki Bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला पंधराशे रुपये दर महिन्याला अकाउंट मध्ये जमा होतील. महाराष्ट्र शासनाने ही योजना चालू करण्याचा उद्देश्य असा आहे की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहिण योजना योजना सुरू करण्याला महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती.
Majhi Ladaki Bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दोन ते अडीच कोटी महिलांना या योजनेचा आतापर्यंत लाभ झालेला आहे आणि त्यांच्या अकाउंट मध्ये प्रत्येकी महिन्याला पंधराशे रुपये जमा झालेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज भरू शकतात.
Majhi Ladaki Bahin Yojana 2024 :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला अर्ज करण्यासाठी पात्रता :
- जी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता वयोमर्यादा ही किमान वय 21 वर्षे पूर्ण व कमाल वय हे 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत या लाडक्या बहिणी योजनेचा महिला लाभ घेऊ शकतील.
- अर्जदार महिलेकडे स्वतःचे आधार लिंक असलेले बँकेचे खाते असणे आवश्यक आहे आणि ते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असले तरी चालेल जसे की पोस्ट ऑफिस, सेंट्रल बँक, स्टेट बँक अश्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचे खाते असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्य बाब म्हणजे या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच (2.50 लाख) लाखापेक्षा जास्त नसावे तीच महिला या आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असेल.
Majhi Ladaki Bahin Yojana 2024 :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी अपात्रता :
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर.
- ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार म्हणून कार्यरत असेल तर.
- जर महिला ही शासनाच्या कोणत्याही अन्य योजनेमध्ये जर दरमहा 1500/- किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेत असेल तर. वरीलप्रकरे महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अपात्र असतील.
Majhi Ladaki Bahin Yojana 2024 :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :
- ज्या कोणी पात्रताधारक महिलांनी अर्ज अजूनपर्यंत केला नसेल आणि करायचा असेल अश्या महिलांनी निवडणूक झाल्यानंतर कदाचित अर्ज प्रक्रिया परत सुरू होऊ शकतील जर अर्ज सुरू झाले तर महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.
- ज्या पात्रताधारक महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल, तर त्यांनी अंगणवाडी सेविका / सेतू सुविधा केंद्र / ग्रामसेवक/ समूह संसाधन व्यक्ती /आशा सेविका /आपले सरकार केंद्र यांच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्द असेल.
- माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
- ज्या पात्रताधारक महिलांनी अर्ज करताना मुख्य बाब म्हणजे अर्जामध्ये अर्जदाराचे नाव , जन्मदिनांक, आपला पत्ता याप्रकारची माहिती आधारकार्ड नुसार असायला हवी जेणेकरून तुमचा अर्ज स्वीकृत होईल आणि तुम्ही या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकतील. तसेच अर्जामध्ये नमूद बँकेचा तपशील किंवा माहिती आणि मोबाईल क्रमांक अगदी बरोबर टाकावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे :
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना आधार कार्ड मध्ये जसे नाव असेल तसेच नाव नमूद करावे.
- पात्रता धारक महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र (DOMECILE CERTIFICATE) असणे आवश्यक आहे जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणते एक असणे आवश्यक आहे.
- ज्या पात्रता धारक महिलांना अर्ज करण्यासाठी वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला पिवळी अथवा केसरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, परंतु शुभ्र शिधापत्रिका असल्यास किंवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता धारक महिलांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे त्या बँक खात्याला त्या महिलांचा आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर या पात्रताधारक महिलांचा फोटो आणि हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज : https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in