maharshtra police practice paper :
maharshtra police practice paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खाली TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. पोलिस क्षेत्राशी संबधित संशोधन करणारी खालीलपैकी संस्था कोणती आहे ?
#2. पोलिस विभागातील K – 9 Unit खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
#3. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांग कोणती आहे ?
#4. भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताचा सर्वात प्राचीन विभाग कोणता आहे ?
#5. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला आहे ?
#6. लंडन येथे इंडिया हाऊसचा स्थापना कोणी केली ?
#7. महाड येथे डिसेंबर 1927 रोजी सत्याग्रह परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष कोण होते ?
#8. 12 ऑक्टोंबर 1906 रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती ?
#9. कोसबाडच्या टेकडीवर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
#10. भारतीय विज्ञान काँग्रेस या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
#11. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र एकूण किती जिल्हे होते ?
#12. तापी या पश्चिम वाहिनी नदीची लांबी किती आहे ?
#13. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ?
#14. निवडणूक आयोगाच्या रचनेशी खालीलपैकी कोणते संविधानिक कलम संबधित आहे ?
#15. देशात सर्वात प्रथम महिला पोलिसांची नेमणुक कोणत्या राज्यात करण्यात आली होती ?
#16. भारतातील कोणत्या राज्यास सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
#17. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#18. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#19. ड्रासेरा वनस्पती कुठल्या वर्गामधील आहे ?
#20. पंचायत राज या विषयाशी संबंधित घटनेतील कोणते प्रकरण आहे ?
#21. पॅरिस पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा कोणत्या खेळाशी संबधित आहे ?
#22. यामिनी कृष्णमूर्ती यांचे या वर्षी निधन झाले आहे , त्या कोणत्या क्षेत्राशी संबधित होत्या ?
#23. महिला आशिया कप 2024 पहिल्यांदा कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने जिंकला आहे ?
#24. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांना नोकरीमध्ये 35 टक्के आरक्षणाला मंजुरी दिली आहे ?
#25. भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे चे उद्धघाटन कोणत्या राज्यात करण्यात आले होते ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
maharshtra police practice paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
maharshtra police practice paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भराती बद्दल अपडेट मिळेल.