Maharashtra TET Hall Ticket Download 2024 : महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र उपलब्ध, डाउनलोड करा
Maharashtra TET Hall Ticket Download 2024 : शिक्षक भरतीचा तयारी करत असलेल्या भावी शिक्षकांसाठी अत्यंत आनंदची बातमी महारष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चे प्रवेश पत्र आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2024 ला जाहीर झालेले आहेत तरी, उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र ऑफिशियल वेबसाइटवरून डाऊनलोड करून घेऊ शकतात. महा टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे 9 डिसेंबर 2024 ला टीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले होते. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो तरुण – तरुणींनी अर्ज सादर केले होते. आता टीईटी चे प्रवेश पत्र सुद्धा जारी करण्यात आले आहे.
Maharashtra TET Hall Ticket Download 2024: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर 2024 ला आयोजित केली आहे. या परीक्षेबद्दल अधिक माहिती तुम्हाला ऑफिसियल वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तरी उमेदवारांनी ती माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि आपल्या प्रवेश पत्रावर दिलेली माहिती व्यवस्थित वाचूनच परीक्षेला जावे. परीक्षा दोन शिफ्ट मध्ये पूर्ण होणार आहे. त्याबद्दलची माहिती आपण खाली पाहून घेवूया.
Maharashtra TET Hall Ticket Download 2024
Maharashtra TET Hall Ticket Download 2024 : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन MSCE बोर्ड करते . या पात्रता परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर एक प्राथमिक स्तर यामध्ये तुम्हाला एकूण 150 प्रश्न असतील आणि 150 गुणांसाठी हे प्रश्न बहुपर्यायी असतील यासाठी तुम्हाला 2 तास 30 मिनिटे वेळ देण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला खालील विषय असतील.
भारतीय तटरक्षक दलात 10 वी पास धारकांसाठी भरतीसाठी इथे क्लिक करा.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 1 (प्राथमिक स्तर) :
- बालअध्यापन शास्त्र आणि विकास
- भाषा 1 ( मराठी/इंग्रजी/हिंदी)
- भाषा 2 (मराठी/इंग्रजी/हिंदी)
- पर्यावरण अभ्यास
- गणित
असे एकूण तुम्हाला 5 विषय असतील आणि प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी असेल .तुम्हाला एकूण 150 प्रश्न असतील आणि 150 गुणांसाठी वरील विषयातून तुम्हाला प्रश्न येतील. सर्व प्रश्न हे तुम्हाला बहुपर्यायी असेल.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 2 (उच्च प्राथमिक स्तर) :
- बाल अध्यापन शास्त्र आणि विकास
- भाषा – 1
- भाषा – 2
- गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान
बाल अध्यापन शास्त्र आणि विकास , भाषा – 1 , भाषा – 2, गणित आणि सामाजिक अभ्यास असे विषयामधून तुम्हाला परीक्षेला एकूण 150 प्रश्न येतील एकूण 150 गुणांनसाठी. वरील कोणत्याही पेपर 1 आणि पेपर 2 साठी नकारात्मक गुणपद्धती नसेल. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन टप्प्यात सकाळी 10.30 ते 13.00 पर्यंत आणि पेपर 2 दुपारी 14.30 ते 17.00 पर्यंत होणार आहे याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. परीक्षेच्या एक तास अगोदरच आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे :
- महाराष्ट्र्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम ऑफिसियल वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईट वर गेल्यानंतर उमेदवारांना मुख पृष्ठावर उमेदवार लॉगिन वर क्लिक करुन आपला नोंदणी क्रमांक किंवा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून त्यामध्ये लॉगिन करून घ्यावे.
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल त्यामधे तुम्हाला हॉल तिकीट असे दिसेल.
- हॉल तिकीट जिथे दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही तुमचे हॉल तिकीट पाहू शकतात आणि डाऊनलोड करून प्रिंट काढू शकतात.
- हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट वर सर्वात पहिले तुमचा बैठक क्रमांक दिसेल. त्यानंतर तुमचा पेपर कोणता आहे ते दिसेल.
- हॉल तिकीट वर तुमचे नाव आणि तुमचा पत्ता दिसेल. आणि तुमच्या परीक्षा केंद्राचा पत्ता तुम्हाला दिसेल.
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा उमेदवारांसाठी विशेष सूचना :
- उमेदवारांना परीक्षा केंद्रात हॉल तिकिट शिवाय कोणत्याही कारणास्तव प्रवेश मिळणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना जो पासपोर्ट फोटो अपलोड केला त्याच्याशी तुमच्याकडे असलेले ओळख पत्रातील नाव व फोटो सारखा असावा. उमेदवारांकडे ओळखपत्र जसे की आधार कार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड अश्या प्रकारचे वैध ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे.. ओळखीच्या पुराव्याशिवाय उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
- ज्या उमेदवारांनी पेपर -1 आणि पेपर -2 साठी अर्ज केला असेल अश्या उमेदवारांना स्वतंत्र दोन हॉल तिकीट मिळतील.
- महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षे करीता उमेदवारांनी परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू होण्याच्या दीड तासापूर्वी यावे.
- पेपर चालू होण्याच्या 20 मिनिटापर्यंत उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येईल त्यानंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
- उमेदवारांना अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेच्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट देऊन अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता.