Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. एक संख्या 45% ने वाढवली तेव्हा तिची किमंत 116 होते तर ती संख्या कोणती ?
#2. दोन वर्गातील संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?
#3. एका संख्यामध्ये त्याच संख्येच्या 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली तर येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती ?
#4. तीन संख्यांची सरासरी ही 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. तर दुसरी संख्या कोणती ?
#5. क्रमाने येणाऱ्या दोन धन संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
#6. 255/16 चे दंशाश अपूर्णांकातील रूप काय असेल ?
#7. 9+9 × 9-9 ÷ 9 ची किंमत किती असेल ?
#8. 0.15 × 0.008 = ? उत्तर शोधा.
#9. श्रिजिताने 7 खुर्च्या व 2 टेबल रू. 1200 ला खरेदी केले. सियाने 3 खुर्च्या व 1 टेबल रू. 550 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलची किमंता किती असेल ?
#10. गणेशला दररोज रू. 150 पगार मिळतो. त्यापैकी मुलांच्या शाळेवर 2/5 खर्च होतो व राहील्यापैकी 1/3 जाण्या-येण्याला खर्च होतो. तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?
#11. क्रमशः 1 ते 20 संख्यांची सरासरी व क्रमशः 1 ते 10 संख्यांची सरासरी यातील फरक काय ?
#12. जर 10, 14, 18, 26, आणि X यांची सरासरी 20 येत असेल तर X ची किंमत काय असेल ?
#13. एक दुकानदार 1 कि.ग्रॅ. वजनाऐवजी 900 ग्रॅम वजन वापरतो. यामुळे तो शेकडा किती नफा कमावतो ?
#14. एका चित्रपटाचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या लोकांची संख्या 40% ने वाढली. तर या प्रवेश शुल्कामुळे उत्पादनात काय बदल झाला ?
#15. एका रकमेवर दोन वर्षांकरिता 4 टक्के दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळव्याज यातील फरक 8 रू. आहे. तर ती रक्कम किती ?
#16. 50 पैसे व 1 रू. यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयांत 50 पैशांची किती नाणी येतील ?
#17. अमर आणि विजय एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात विजय एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर अमर एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?
#18. एका कोल्ड्रिंक्सच्या कारखान्यात एक मशीन 1200 बॉटल 5 तासात भरते. 6 तासात ते मशीन किती बॉटल भरेल ?
#19. 200 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किमी वेगाने धावते, तर 250 मी. लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल ?
#20. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेमी, 4 सेमी आणि 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?
#21. 6.37 मीटर लांबीची तार वाकवून तिचे वर्तुळ केले तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल ?
#22. खालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने निःशेष भाग जातो ?
#23. एका संख्येची 25 टक्के किंमत जर 0.25 टक्के असेल तर ती संख्या कोणती ?
#24. 8667 या संख्येतील 6 ह्या संख्येच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
#25. 1, 3, 4 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
#26. एका सांकेतिक लिपीत RED=9 आणि BLUE=10 तर WHITE= ?
#27. जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER= ?
#28. खालील संख्यांमधून विसंगत संख्या निवडा.
#29. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.- 6, 24, 72, 240, 726
#30. 86 : 29 :: 98 : ? खालील पर्यायातून योग्य उत्तर शोधा.
#31. RTNP : JLFH :: XZTV : ? शृंखला पूर्ण करा.
#32. 1, 5, 11, 19,.?.., 41 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यंत निवडा.
#33. 11, 5, 20, 12, 38, ..?.., 74, 54 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल ?
#34. ओजस्वीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येइल ?
#35. घड्याळात 11.20 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांमध्ये होणारा कोन किती मापाचा असेल ?
#36. तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वात लहान आणि मोठ्या व्यक्तींच्या वयातील फरक किती ?
#37. एक भक्त मंदिरात गेला असता, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, तर त्याच्याकडे किती फुले होती ?
#38. C ही A ची एकुलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे. D हा C चा एकुलता एक भाऊ आहे. तर A ही D ची कोण ?
#39. गुलाब : ताटवा :: उंट : ?
#40. A, C, E, G, ? – अक्षरमालिका पूर्ण करा.
#41. AC, BC, CE, DE, ?, FG – अक्षर मालिका पूर्ण करा.
#42. अर्णवची आई ही दयाची मामी लागते, तर दयाची आई अर्णवच्या आईची कोण ?
#43. aa_bbb_ccd_d_ee – खालील पर्यायातून योग्य उत्तर शोधा.
#44. जर C = 27, E = 125 तर H = काय असेल ?
#45. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, ?
#46. 1, 8, 27, 64, 125, 216, ?
#47. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर विमाने कोठे उडतील ?
#48. 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?
#49. जर शिक्षकदिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?
#50. सिया व ओजस्वी यांच्या वयाची बेरीज 19 वर्षे आहे. ओजस्वी सियापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे, तर सियाचे वय काढा.
#51. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
#52. विस्तव, पावक, अग्नी या शब्दांना समानार्थी शब्द ओळखा.
#53. विग्रह करा. – पित्राज्ञा
#54. ‘वानर’ झाडावर चढले. दिलेल्या शब्दाची जात ओळखा.
#55. खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा
#56. नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा.
#57. पगडी या शब्दाचे नपुसकलिंगी रूप ओळखा.
#58. ‘ती चाकूने भाजी चिरते’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा
#59. जो, जी, जे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत ?
#60. ‘दसपट रुपये’ विशेषणाचा प्रकार ओळखा.
#61. मधु लाडू खातो. या वाक्याचा रीतीवर्तमानकाळ ओळखा
#62. आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील ‘थोडे’ हा शब्द काय आहे.
#63. खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ?
#64. नळे इंद्राशी असे बोललीजेले. प्रयोग ओळखा.
#65. तानाजी लढता लढता मेला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
#66. ‘मुले घरी गेली’ या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा.
#67. ‘पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.’ वरील वाक्यप्रकार ओळखा.
#68. ‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?
#69. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात ?
#70. ‘मुख कमळासारखे सुंदर आहे’ या वाक्यातील ‘उपमान’ कोणते ते ओळखा.
#71. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
#72. ‘आम्ही गहू खातो.’ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?
#73. मीठ-भाकरी म्हणजे काय ?
#74. गाजरपारखी म्हणजे काय ?
#75. ‘पदरी पडले झोंड,…….’ म्हण पूर्ण करा.
#76. खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?
#77. भारतातील कोणत्या राज्यात रबराचे सर्वात जास्त उत्पादन होते ?
#78. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
#79. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते ?
#80. पैनगंगा या नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
#81. भातसा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#82. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळून येते ?
#83. महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
#84. महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
#85. नर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
#86. प्रबोधन या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
#87. आगाशीव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#88. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
#89. महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा ‘विश्व कुटुंबाचा जाहीरनामा’ या शब्दात गौरव केला जातो ?
#90. उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?
#91. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
#92. विधानपरिषद सदस्यांचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
#93. महाराष्ट्र पोलिस अकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#94. पोलिस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते ?
#95. होमगार्डचा प्रमुख कोण असतो ?
#96. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कोणत्या आयोगाचा भारत पुन्हा एकदा सदस्य झाला आहे ?
#97. गोव्यात संपन्न झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे ?
#98. ‘अग्नि वॉरियर’ हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात येत असतो ?
#99. महाराष्ट्र राज्यात एकूण वाघांची संख्या किती आहे ?
#100. महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप 2024 कोणत्या देशाच्या संघाने जिंकली आहे ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.