
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी बंपर भरती सुरू झाली आहे तरी अहर्ता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज सादर करावा.
Indo -Tibetin Border Police Force (ITBP) :
- सरकारी नोकरची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी बंपर भरती सुरू झाली आहे , तरी तरुणांनी आजच ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करावा. अर्ज भरण्याच्या पूर्वी तरुणांनी दिलेल्या पदाबाबत सविस्तर जाहिरात पाहून अर्ज सादर करावा.
- ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदाची माहिती ITBP (Indo-Tibetan Border Police) ही भारत सरकारची एक प्रमुख अर्धसैनिक बल आहे, जी मुख्यतः चीनच्या सीमेजवळ सुरक्षेसाठी कार्यरत आहे.
- ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला विविध प्रकारच्या वाहनांचे चालक म्हणून काम करावे लागते. त्यांना सुरक्षा कार्यासाठी वाहने चालवण्याची, अधिकाऱ्यांना शर्थीत नेण्याची, आणि आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तातडीने पोहोचण्याची जबाबदारी असते.
- अर्ज प्रक्रियाITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करता येईल . उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागतो. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि सुसंगत असावी लागते.
- INDO- TIBETIAN BOARDER POLICE FORCE मध्ये राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणीक पात्रता/ शारिरीक पात्रता आणि भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
- ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया ही फक्त मुलांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
- ITBP मध्ये तुमची निवड ही PET / PST/ लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी इत्यादी टप्प्यांद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण भारतात कर्तव्य बजावण्यासाठी रजू होतील.
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांची संख्या व पात्रता :
पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या | पदासाठी पात्रता |
कॉन्स्टेबल चालक | 545 | 1) इयता दहावी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावी. 2) वैध अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा. |
वयोमर्यादा | 21 वर्ष ते 27 वर्षाच्या दरम्यान असावे. | 1) SC/ST साठी 5 वर्ष शिथिल. 2) OBC(NON CRIMIYER) साठी 3 वर्ष शिथिल. |
वेतन व भत्ते | लेव्हल- 3 मध्ये बेसिक 21700-69100/- रुपये ( 7 व्या वेतन आयोगानुसार) | 1) पगारासोबत इतर भत्ते दिल्या जातात जसे की महागाई भत्ता, रेशन भत्ता, HRA आणि मोफत वैद्यकीय सेवा अश्या अजून भरपूर सुविधा देण्यात येतात. |
शारिरीक पात्रता उंची व छाती | उंची 170 सेमी असावी आणि काही प्रवर्गासाठी उंचीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. | छाती न फुगवता 80 सेमी आणि फुगवून 85 सेमी असायला पाहिजे. |
परीक्षा फी | UR/OBC/EWS साठी -100 रुपये | SC/ST/EXM साठी फी नाही |
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांची कॅटेगरी नुसार पदांची विभागणी :
UR | SC | ST | OBC | EWS | TOTAL |
209 | 77 | 40 | 164 | 55 | 545 |
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :
इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स कॉन्स्टेबल ड्रायव्हर साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08/10/2024 ते 06/11/2024 असेल.
1 thought on “ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी बंपर भरती 2024 अर्ज सुरू”