Indian Coast Guard Bharti – 2024 : भारतीय तटरक्षक दलात 10 वी पास धारकांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध
Indian Coast Guard (ICG) Bharti –2024 : नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये इयत्ता 10 वी पास धारकांसाठी भारतीय तटरक्षक दल मुख्यालय , वरळी मुंबई इथे भरतीसाठी जाहिरात जाहीर झाली आहे, तरी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा जेणेकरून तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल.
Indian Coast Guard (ICG) Bharti – 2024 : या भरती मध्ये इयत्ता दहावी पास धारकांसाठी फायरमन, लष्कर, MTS (मल्टी-टास्किंग स्टाफ) आणि ड्रायव्हर अश्या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतातील तरुण आणि तरुणी या पदांसाठी अर्ज करू शकतात. भारतीय तटरक्षक दलाच्या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने योग्यरित्या अर्ज भरून Headquarters Coast Guard Region (West) Worli Sea Face PO, Worli Colony, Mumbai – 400 030 या पत्यावर पोस्टाने 19 नोव्हेंबर 2024 च्या आत पोहोचतील अश्या तऱ्हेने अर्ज पाठवायचे आहे.
Indian Coast Guard (ICG) Bharti – 2024 : In this recruitment, the advertisement for the posts of Fireman, Lashkar, MTS (multi-tasking staff) and Driver released for 10th pass holders. Male and female from all over India can apply for this recruitment. Indian Coast guard recruitment Offline application for should be duly filled and Send to Headquarters Coast Guard Region (West) Worli sea face PO, Worli Colony, Mumbai – 400 030 by Post so as to reach by 19th November 2024.
आयटीबीपी कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती
Indian Coast Guard (ICG) Bharti – 2024 : पदे व पदांच्या रिक्त जागा
| पदाचे नाव | रिक्त पदे | शैक्षणीक पात्रता |
| इंजिन ड्रायव्हर (रू.25500-81000) | 04 पदे (UR-02/ST-01/EWS –01) | इयत्ता 10 वी पास आणि इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र + 02 वर्ष अनुभव |
| सारंग लष्कर (रू.25500-81000) | 01 पद (EWS–01) | इयत्ता 10 वी पास + ITI + अनुभव |
| लस्कर (रू.18000-56900) | 07 पदे (OBC-02/UR–03/EWS– 01/ST–01) | इयत्ता 10 वी पास + 03 वर्ष अनुभव |
| फायर इंजिन ड्रायव्हर (रू.21700-69100) | 01 पद (EWS–01) | इयत्ता 10 वी पास + अवजड वाहन परवाना + 03 वर्ष अनुभव |
| फायरमन (रू.19900-63200) | 04 पदे (UR–02/OBC–02) | इयत्ता 10 वी पास आणि शारिरीक दृष्ट्या सुदृढ |
| सिविलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Ordinary Grade) (रू.19900-63200) | 10 पदे (SC–01/ST–01/OBC– 02/UR–04/EWS–02) | इयत्ता 10 वी पास + अवजड+साधे वाहन परवाना + 02 वर्ष अनुभव |
| मल्टी-टास्किंग स्टाफ (Peon) (रू. 18000-56900) | 01 पद (EWS–01) | इयत्ता 10 वी पास + 02 वर्ष अनुभव |
| मल्टी-टास्किंग स्टाफ (Chaukidar) (रू.18000-56900) | 2 पदे (EWS–01/UR–01) | इयत्ता 10 वी पास + 02 वर्ष अनुभव |
| MT फिटर (रू.19900-63200) | 02 पदे (EWS–01/OBC–01) | इयत्ता 10 वी पास + ITI + 02 वर्ष अनुभव |
| फॉरलिफ्ट ऑपरेटर (रु.19900-63200) | 01 पद (UR–01) | इयत्ता 10 पास + इंग्रजीचे ज्ञान + ITI + 03 वर्ष अनुभव + अवजड वाहन परवाना |
| अनस्किल्ड लेबर (रू.18000-56900) | 02 पदे (EWS–01/UR–01) | इयत्ता 10 वी पास किंवा ITI पास + 03 वर्ष अनुभव |
| टर्नर (Skilled) (रू. 19900-63200) | 01 पद (OBC–01) | इयत्ता 10 वी पास + 04 वर्ष अनुभव |
Indian Coast Guard (ICG) Bharti – 2024 : वयोमर्यादा :
- UR/EWS साठी फायरमन, सिवीलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (ऑर्डीनरी ग्रेड) MTS (Peon), MTS (Chowkidar), MT फिटर, फोरलिफ्ट ऑपरेटर, अनस्किल्ड लेबर आणि टर्नर (Skilled) इत्यादी पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षादरम्यान. OBC साठी 03 वर्ष वयामध्ये शिथिलता असेल. SC/ST साठी 05 वर्षापर्यंत वयामध्ये सूट देण्यात येईल.
- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल.
- इंजिन ड्रायव्हर, सारंग फिटर, लास्कर, फायर इंजिन ड्रायव्हर इत्यादी पदांसाठी UR/EWS साठी वय 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल. OBC साठी वयोमर्यादेत 03 वर्षापर्यंत शिथिलता असेल. आणि SC/ST साठी वय 18 ते 35 वर्षापर्यंत असेल.
Indian Coast Guard (ICG) Bharti – 2024 : निवड पद्धती
Indian Coast Guard (ICG) Bharti – 2024 : सर्वात पहिले आलेल्या अर्जांची पडताळणी होईल आणि कागदपत्रांच्या साक्षांकित अर्जासोबत जोडल्या आहेत की नाही त्याची तपासणी होईल. नंतर शोर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात येईल. प्रवेशपत्र आल्यानंतर सर्वात प्रथम उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भरावा. अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर त्या अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स सोबत जोडून पाठवावे.
- पासपोर्ट फोटो
- दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
- उच्च शिक्षणाची कागदपत्रे
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र
अधिक माहिती आणि अर्ज
| अधिक माहिती PDF | इथे पहा |
| अर्ज डाउनलोड करा | इथे क्लिक करा |
| ऑफिसियल वेबसाईट | https://indiancoastguard.gov.in |