GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 वी पास साठी निघालेली भरती पुढे ढकलण्यात आली आहे

GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 वी पास साठी भरतीची जाहिरात प्रकाशित
GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 वी पास साठी भरतीची जाहिरात प्रकाशित

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 GMC Bharti Kolhapur 2024 :

    नमस्कार मित्रांनो आपल्या नोकरीपॉईंट या वेबसाईटवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट – ड (वर्ग – 4 ) संवर्गातील इयत्ता दहावी पास धारकांसाठी सरळसेवेने भरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती पण निवडणुकीमुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे, तरी निवडणूका संपल्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे तरी,पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा दिनांक 31/10/2024 पासून ते 20/11/2024 या दरम्यान अर्ज सादर करावा. 

    सदर या भरतीची पूर्ण प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे, तरी उमेदवारांना अधिक अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करावा लागेल आणि स्वतंत्र त्याची फी द्यावी लागेल. सदर नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर मध्ये असेल.

     सदर या वैद्यकीय महाविद्यालयात भरतीमध्ये सदर 102 पदांसाठी भरती होणार आहे तरी या सुवर्णसंधीचा तरुणांनी लाभ घ्यावा. सदर परीक्षा ही कम्प्युटर बेस टेस्ट ऑनलाईन (CBT) पद्धतीने घेण्यात येणार असून  एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे त्याचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने गुण निश्चित केल्यानंतर  निकाल जाहीर करण्यात येईल.

GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय भरतीसाठी पदे :

राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट – ड (वर्ग- 4) संवर्गातील इयत्ता दहावी पास धारकांसाठी सरळसेवेने भरतीची उपलब्ध पदांचा तपशील खालीलप्रमाणे असेल

पदाचे नाव  संस्थेचे नाव   वेतन व भत्ते रिक्त पदांची संख्या

प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर रू.19900 – 63200/- रू. 08
शिपाई (महाविद्यालय) राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर रू.15000 – 47600/- रू. 03
मदतनीस (रुग्णालय) छत्रपती प्रमिलारजे सर्वोपचार रुग्णालय , कोल्हापूर रू. 15000 – 47600/- रू. 01
क्ष किरण परिचर (रुग्णालय) छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय , कोल्हापूर रू. 15000 – 47600/- रू. 07
शिपाई (रुग्णालय) छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय , कोल्हापूर रू. 15000 – 47600/- रू. 08
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) छत्रपती प्रमिलारजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रू.19900 – 63200/- रू. 03
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रू. 15000 – 47600/- रू. 04
अपघात सेवक (रुग्णालय) छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रू. 15000 – 47600/- रू. 05
बाह्यरुग्णसेवक( रुग्णालय) छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रू. 15000 – 47600/- रू. 07
कक्षसेवक (रुग्णालय) छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय ,कोल्हापूर रू.15000 – 47600/- रू. 56
    एकूण पदे 102

 GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरतीसाठी शैक्षणीक पात्रता :

  • वैद्यकीय महाविद्यालयात निघालेल्या सरळसेवा गट – ड नमूद पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक ६ जून 2017 च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व पदांकरता ही दहावी पासच अहर्ता असेल.
  • प्रयोगशाळा परिचर या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण केलेली असावी.
  • वरील सर्व पदांकरिता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय भरतीसाठी वयोमर्यादा :

  • राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे निघालेल्या गट – ड या पदासाठी असलेली वयोमर्यादा खालीलप्रमाणे. 
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयाची अट ही 30/09/2024 या दिनांकास  18 वर्ष पूर्ण ते 38 वर्ष या दरम्यान असायला हवी.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळता इतर सामाजिक आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची अट ही 18 वर्ष पूर्ण ते 43 वर्षादरम्यान असायला हवी.
  • माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा ही सेवा कालावधी + 3 वर्ष , तथापि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत वय असेल.
  • अंशकालीन साठी वयोमर्यादा ही 18 ते 55 वर्षापर्यंत असेल.
GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप :
  • वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर इथे निघालेल्या भरतीसाठी परीक्षा ही आयबीपीएस ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे त्याचा सविस्तर आढाव अपणंन घेऊ.
  • गट – ड पदांसाठी मराठी , इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी विषय तुम्हाला परीक्षेला असतील.
  • प्रत्येकी प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न असतील आणि 50 गुण प्रत्येक विषयासाठी असेल म्हणजेच एक प्रश्न 2 गुणांचा असेल.
  • सदर ही परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येईल आणि प्रश्न असतील एकूण 100 .
  • या ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेसाठी 2 तास म्हणजेच 120 मिनिटांचा वेळ या परीक्षेला देण्यात येईल.
GMC Bharti Kolhapur 2024 : महाविद्यालय भरतीसाठी परीक्षा शुल्क :
  • खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असेल.
  • राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असेल.
  • माजी सनिकांसाठी परीक्षा शुल्क नसेल.
अधिक माहिती PDF जाहिरात: इथे पहा
ऑनलाईन अर्ज करा : इथे करा 
टिप: जर कोणाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल घर बसल्या तर 9356212938 या क्रमांकावर whatsapp करा.

  

Leave a Comment