Coal India limited Bharti 2024 : कोल इंडिया लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांसाठी भरती सुरू
Coal India limited Bharti 2024 : इंजीनियरिंग पदवीधर तरुणांसाठी कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सदर या भरती प्रक्रियेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेली आहे, तरी याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल तरी इच्छुक तरुणांनी या भरतीचा लाभ घ्यावा तसेच या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने तरुणांना करता येईल.
Coal India limited Bharti 2024 : Coal India limited has announce said the recruitment for 640 engineering graduate position the post of management trainee (MT). The recruitment is open for various engineering discipline. The application will be start 29th October 2024 and last date for this application 28 November 2024. the Detailed instruction available on official website on CIL www.coalindia.in may be refered at the time fill up your online application on time.
भारतीय तटरक्षक दल भरती 2024
Coal India limited Bharti 2024 : सदर कॉल इंडिया लिमिटेड ही एक महारत्न कंपनी आहे, तरी तरुणांना यात करिअर करण्याची एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. अहर्ता प्राप्त तरुणांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना दिलेल्या पदाबद्दल संबंधित सर्व माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपला ऑनलाईन अर्ज भरताना चुका होणार नाही. जर उमेदवारांनी चुकीची माहिती अर्जामध्ये भरल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो त्यासाठी उमेदवारांनी काळजीपूर्वकच माहिती बघूनच अर्ज भरावा.
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या :
| पदाचे नाव | पदांची संख्या |
| मायनिंग (MINING) | 263 |
| सिव्हिल (CIVIL) | 91 |
| इलेक्ट्रिकल (ELECTRICAL) | 102 |
| मेकॅनिकल (MECHANICAL) | 104 |
| सिस्टम (SYSTEM) | 41 |
| E & T | 39 |
| TOTAL | 640 |
शैक्षणिक पात्रता :
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| मायनिंग (MINING) | कमीत- कमी 60% गुणांसह मायनिंग इंजिनियरिंग पदवी प्राप्त. |
| सिव्हिल (CIVIL) | कमीत – कमी 60% गुणांसह संबधित शाखा इंजिनियरिंगची पदवी प्राप्त. |
| इलेक्ट्रिकल (ELECTRICAL) | कमीत – कमी 60% गुणांसह संबधित शाखा इंजिनियरिंगची पदवी प्राप्त. |
| मेकॅनिकल (MECHANICAL) | कमीत – कमी 60% गुणांसह संबधित शाखा इंजिनियरिंगची पदवी प्राप्त. |
| सिस्टम (SYSTEM) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बी. ई. / बी. टेक / बी. एससी (Engg.) कॉम्प्युटर सायन्स मध्ये / कॉम्प्युटर इंजिनियरिंग / आय. टी. किंवा कोणतेही प्रथम श्रेणी मध्ये MCA पास. |
| E&T | बी. ई./ बी. टेक/ बी. एससी (Engg.) संबधित शाखेमध्ये इंजिनियरिंग कमीत – कमी 60% गुणांसह पदवी प्राप्त. |
परीक्षा फी :
- UR/ OBC ( Non – Creamy Layer and Creamy Layer ) / EWS इत्यादी प्रवर्गासाठी 1180 रुपये परीक्षा फी असेल.
- SC/ ST/ PwBD इत्यादींसाठी फी मध्ये सवलत असेल.
- परीक्षा फी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. सदर परीक्षा फी ही नॉन – रिफुंडबल असेल.
दिलेल्या पदांसाठी वयोमर्यादा :
- सदर जास्तीत जास्त वय हे 30 वर्ष असेल आणि ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जनरल(UR) आणि EWS मधील उमेदवारांसाठी असेल.
- प्रवर्गानुसार वयामध्ये शिथिलता असेल ते जसे की OBC(Non-Creamy Layer) साठी 3 वर्षापर्यंत आणि SC/ST साठी 5 वर्षापर्यंत वयामध्ये शिथीलता असेल.
- अपंग उमेदवारांसाठी – जनरल(UR) साठी 10 वर्ष/ OBC साठी 13 वर्ष आणि SC/ST साठी 15 वर्षे वयामध्ये शिथिलता असेल.
वेतन व सुविधा :
- निवड झालेल्या उमेदवारांना मॅनेजमेंट ट्रेनि E-2 या पदासाठी ठेवले जाईल. त्यांना वेतन 50,000 – 1,60,000/- रुपये या दरम्यान मिळेल त्यामध्ये पन्नास हजार उमेदवारांचं बेसिक पगार असेल.
- एका वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियमित वेतन E-3 ग्रेडमध्ये देण्यातील जसे की 60,000 – 1,80,000/- रु.पर्यंत असेल.
- निवड झालेल्या उमेदवारांना या वेतनासोबत महागाई भत्ता, एच. आर. ए. , रजा, वैद्यकीय सुविधा, सीएमपीएफ, सीएमपीएस, ग्रॅच्युईटी, CIL परिभाषित योगदान पेन्शन योजना इत्यादी कंपनीच्या नियमानुसार त्यांना अधिक भत्ते व सुविधा असेल.
तरुणांसाठी महत्त्वाच्या सूचना अर्जासंदर्भात :
- पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नमूद जाहिरातीतील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून व्यवस्थितरीत्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज सादर करावा. अंतिम तारखेची वाट बघू नये, तुम्ही जर शेवटच्या दिवशी अर्ज सदर करत असाल तर , तुमचा अर्ज सबमिट व्ह्यायला अडचण येऊ शकते.
- उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे किंवा आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवूनच अर्ज भरावा. जेणेकरून तुमचा अर्ज चुकणार नाही.
महत्त्वाच्या तारखा व ऑनलाईन अर्ज आणि अधिक माहिती :
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 29 ऑक्टोंबर 2024 |
| अधिक माहिती | येथे पहा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |